यूपीएससी परीक्षेत कोपरगावच्या दिव्या गुंडेने चमकवला यशाचा दिवा

कोपरगाव -कोपरगाव तालुक्‍यातील चांदगव्हाण येथील रहिवासी दिव्या अर्जून गुंडे हीने केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) परीक्षेत घवघवीत यश संपादन करून दिव्याने आपल्या यशाचा दिवा देशात चमकवला.

मागील वर्षी झालेल्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला.त्यात दिव्या गुंडे हिने 338 वा क्रमांक पटकावला. दिव्या ही गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना अर्जुन गुंडे (खांडेकर) व नाशिक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन तुळशीराम गुंडे यांची कन्या आहे. तिचे शिक्षण नाशिक, पुणे येथे झाले असून इंग्रजीमधुन पदवी घेतल्यानंतर दिव्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली.

आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत दिव्याने उच्चपदाधिकारी होण्याचा मान मिळविल्याने जिल्हाधिकारी नयना गुंडे व अतिरिक्त मुख्याधिकारी अर्जून गुंडे यांची एकुलती एक मुली अधिकारी झाल्याने एकाच घरात जिल्हाधिकारी दर्जाचे तिघे झाल्याने कोपरगाव तालुक्‍यातील चांदगव्हाण गावासह तालुक्‍याची शान अभिमानाने उंचावली आहे.

दिव्या गुंडेच्या यशाबद्दल आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, सभापती पौर्णिमा जगधणे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, शिवाजी तुळशीराम गुंडे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे आदींनी अभिनंदन केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.