मुंबई- शुभमन गिलची पत्नी असं गुगल सर्च केलं तर तुम्हाला सारा तेंडुलकर असं उत्तर मिळेल. हो हे खरं आहे. तुम्ही फक्त शुभमन गिल वाईफ असं गुगल बारमध्ये सर्च करा मग तुम्हाला गुगल सारा तेंडुलकर च्या नावासोबत तिचा फोटो देखील दाखवेल. यामुळे सारा तेंडुलकर गुगल सर्च इंजिनवर सध्या चर्चेत आहे
राशिद खानची पत्नी कोण सर्च केल्यास दाखवतंय अनुष्का शर्माचं नाव
I am really loving these #SaraTendulkar and #ShubmanGill rumours ❤️ #kkr #IPL2020
— Dipesh🇳🇵 (@Thejuly23rdd) October 12, 2020
काही दिवसांपूर्वीच तुम्ही फक्त राशिद खान वाईफ असं गुगल बारमध्ये सर्च करा मग तुम्हाला गुगल अनुष्का शर्माच्या नावासोबत तिचा फोटो देखील येत होते.
आता मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही शुभमन गिलची पत्नी आहे असा नवा गोंधळ गुगलने घातला आहे. भारताचा युवा क्रिकेटपटून शुभमन गिलची पत्नी असे सर्च केल्यास सारा तेंडुलकरचे नाव येते आहे.
#Google #memesdaily #Memes #Shubmangill #SaraTendulkar pic.twitter.com/Y8IxKShPHX
— Dev Basrani (@dev_basrani) October 15, 2020
दरम्यान प्रसारमाध्यमांपासून सारा शक्यतो दूर राहणेच पसंत करते. तिचे लग्नही झालेलं नाही. तरीही शुभमन गिलची पत्नी असं सर्च केल्यास तिचं नाव दाखवलं जातं आहे. गुगलचा गेल्या काही दिवसांमध्ये काहीसा गोंधळ उडाल्याचं दिसतं आहे. त्यामुळे रशिद खानची पत्नी सर्च केलं की अनुष्का शर्माचं नाव तर शुभमन गिलची पत्नी म्हणून सर्च केल्यास सारा तेंडुलकरचं नाव येतं आहे.