पुणे – मूळचा दक्षिण भारताचा रहिवासी असलेला मात्र विणीच्या काळात उत्तरेकडे स्थलांतर करणारा रंगीबेरंगी असा नवरंग पक्षी हा कायमच नागरिकांचे लक्ष वेधतो.
नुकतेच चिंचवडमध्ये पहिल्यांदाच हा पक्षी आढळल्याची नोंद पक्षी निरीक्षकांनी नोंदविली आहे.
वन्यजीव प्रकाशचित्रकार विश्वनाथ भागवत आणि रिया भागवत यांना पक्षी निरीक्षण करताना चिंचवडमध्ये हा पक्षी नुकताच दिसला.
इंग्रजीत “इंडियन पिट्टा’ असे नाव असलेला हा एक लाजाळू पक्षी आहे. जमिनीवर पालापाचोळ्याखाली दडलेल्या अळ्या, मुंग्या इतर किटक टिपतो.