जाणून घ्या, ‘सोनू सूद’चा फिटनेस मंत्र

मुंबई- बॉलिवूडचा रिअल लाईफ हिरो म्हणजे, अभिनेता ‘सोनू सूद’ हा गेल्या काही महिन्यांपासून अनेकांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर विविध भागांमध्ये अडकललेल्या पररराज्यातील स्थलांतरित मजुरांना आपल्या मुळ गावी पोहोचवण्यापासून ते अनेकांना आर्थिक मदत करेपर्यंत शक्य त्या सर्व परिंनी सोनूनं सढळ ह्स्ते मदत केली. पण केवळ उदार मनासाठीच नाही तर फिटनेसमुळेही सोनूची बॉलिवूड विश्वात एक वेगळी ओळख आहे.

सोनू स्वतःच्या फिटनेसकडे कधीही दुर्लक्ष करत नाही. तो काळजीपूर्वक पौष्टिक आहाराचं सेवन करतो. फिटनेसमधील आपल्या उणिवांकडेही लक्ष देतो. तसंच शरीराची देखभाल करण्यासाठी आवश्यक असलेल्या खाद्यपदार्थांचं सेवन करण्यावर त्याचा भर जास्ती असतो.

आपले शरीर फिट आणि हेल्दी ठेवण्यासाठी नियमित एक तास जिम करणं अतिशय आवश्यक आहे. असं सोनू सूदचं म्हणणं आहे. सुरुवातीला जास्त कठीण स्वरुपातील व्यायाम न करता सोपी आणि सहज करता येतील असे व्यायाम करा. शरीर फिट राहण्यासाठी व्यायामाची भूमिका महत्त्वाची असते.

लॉकडाउनदरम्यानही सोनू सूद घरात दररोज व्यायाम करत आहे. फिट राहण्यासाठी व्यायाम करणं अतिशय आवश्यक आहे. व्यायाम करण्यासाठी कंटाळा करू नका. यामुळे आपल्या शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. आणि तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागेल. जर तुम्हालाही सोनू सूद सारखं फिटनेस हवं असेल तर नियमित स्वरुपात व्यायाम करणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.