- एटीएम मशिनमध्ये स्कीमर लावून नागरिकांचे पैसे लंपास
- सिंहगड रस्ता परिसरातील घटना
- तीन चोरट्यांना पोलिसांकडून अटक
पुणे – सिंहगड रस्ता परिसरातील क्राऊन बेकरी समोरील एका बॅंकेच्या एटीएम मशिनमध्ये स्कीमर लावून नागरिकांचे पैसे चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली.
विश्वजित छत्री (वय 33, दांडा खार, मुंबई), प्रकाश शेट्टी (वय 46, दहिसर, मुंबई), फैजी अल्ताफ रझा (वय 43, अंबरनाथ, ठाणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत 39 वर्षीय महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादी 26 सप्टेंबरला सनसिटी भागात असलेल्या एका एटीएम मशिनमधून 10 हजार रुपये काढले. त्यानंतर 30 सप्टेंबरला त्या घरी असताना त्यांना 40 हजार रुपये बॅंक खात्यातून कमी झाल्याचा मोबाइलवर मेसेज आला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सिंहगड रस्ता पोलिसांकडे तक्रार दिली. दरम्यान, अशाच प्रकारे अनेकांना आर्थिक गंडा घातल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. दरम्यान,सायबर पोलिसांनी तपास करून या तीनही आरोपींना बालेवाडी परिसरातून अटक केली.