मुंबई – सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स कनेक्शनमध्ये अटक झालेल्या रिया चक्रवर्तीची सुमारे महिनाभराने आज
सुटका झाली आहे. यावेळी भायखळा तुरूंगाबाहेर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. रियाच्या सुटकेवेळी प्रसारमाध्यमांनीही मोठी गर्दी केली होती.
Mumbai: Actor Rhea Chakraborty released from Byculla jail after a month.
She was granted bail by Bombay High Court in a drug-related case filed against her by Narcotics Control Bureau (NCB) pic.twitter.com/FlfP1re1cQ
— ANI (@ANI) October 7, 2020
ड्रग्स कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती यांसह इतर 18 आरोपींची न्यायालयीन कोठडी आज संपणार होती. मात्र याप्रकरणी मंगळवारी सुनावणी करताना मुंबई कोर्टाने रिया आणि शौविक यांच्या कोठडीत 20 ऑक्टोंबरपर्यंत वाढ केली होती. मात्र कोर्टाने आज रियाला सशर्त जामीन मंजूर केला असून
शौविकचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
रिया चक्रवर्तीला 8 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. आज अखेर महिनाभराने तीची भायखळा तुरूंगातून सुटका झाली आहे.