नवी दिल्ली- औषधांच्या ई-कॉमर्स क्षेत्रात मजबूत पाय रोवण्यासाठी रिलायन्स कंपनी या क्षेत्रातील छोट्या कंपन्या खरेदी करीत आहे. ई-फार्मसी क्षेत्रातील नेटमेडस् कंपनीचे बरेच भागभांडवल रिलायन्स कंपनीने 620 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.
नेटमेडस् कंपनी सध्या 670 शहरात कार्यरत आहे. डॉक्टरांचा सल्ला व औषधांचा पुरवठा या कंपनीकडून ई-कॉमर्सवरून केला जातो. 2019 मध्ये रिलायन्सने याच क्षेत्रातील सी स्क्वेअर कंपनीचे अधिग्रहण केले होते. अमेझॉन कंपनीही भारतामध्ये ही फार्मसी क्षेत्रात पाय रोवण्याचा प्रयत्न करीत आहे.