अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार या दोन बड्या कलाकारांनी गाजवलेल्या “शक्ती’मध्ये या दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळाली होती. एरवी अमिताभ बच्चन यांच्या हिरोईनचा रोल करणाऱ्या राखीला या सिनेमात अमिताभच्या आईचा रोल मिळाला होता.
सोबत स्मिता पाटील यांची सुरेख अदाकारी होती. अनिल कपूरलाही एका छोट्या रोलमध्ये या सिनेमात स्थान दिले गेले होते. कायद्याचे पालन करणारा पोलीस अधिकारी आणि वडिलांवर नाराज झाल्यामुळे गुन्हेगारीच्या मार्गावर गेलेला त्याचा मुलगा यांच्यातील संघर्षाची कथा असलेल्या या संस्मरणीय सिनेमाचा रिमेक आता लवकरच केला जाणार आहे.
“टॉयलेट-एक प्रेमकथा’ आणि “बत्ती गुल मीटर चालू’ सारख्या सिनेमांचे दिग्दर्शन करणारे नारायण सिंह आपल्या दोन सहकाऱ्यांसह या रिमेकच्या स्क्रीप्टवर काम करत आहेत. मात्र आपला सिनेमा “शक्ती’ पासून प्रेरणा घेतलेला असेल, त्या सिनेमाचा रिमेक असणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
या सिनेमासाठी अमिताभ बच्चन यांना दिलीप कुमार यांनी केलेला रोल आणि अमिताभ यांनी केलेला रोल अभिषेक बच्चनला द्यायची त्यांची कल्पना होती. पण ते समीकरण जुळले नाही. आता नव्या कलाकारांची निवड केली जाणार आह