शिराळा (प्रतिनिधी) : जिल्ह्यात आज मनपा विभागात 48, शहरी भागात 15, ग्रामीण विभागात 62 नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची रुग्णसंख्या 4199 वर पोहोचली आहे. पॉझिटिव्ह पैकी आज आखेर बरे झालेले रुग्ण संख्या 1783 आहे. आज उपचारा खाली 2289 रुग्ण आहेत. जिल्ह्यातील 127 रुग्णांचा आज अखेर मृत्यू झाला आहे.
मनपा क्षेत्रातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. आज अखेर मनपा क्षेत्रातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 2542 आहे. शहरी भागात 298, ग्रामीण भागात 1359 आहे. आज 1193 टेस्ट घेण्यात आल्या त्यापैकी 164 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 436 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या त्यापैकी 66 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.
तालुकानिहाय आजची पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आटपाडी 4,जत 2, कडेगाव 5,कवठेमहांकाळ 3, खानापूर 4, मिरज 27,पलूस 13,शिराळा 5,तासगाव 7,वाळवा 7, सांगली 113,मिरज 35, अशी आहे. आजच्या मृतांमध्ये सांगली येथील 62 व 80 वर्षांची महिला. मिरज येथील 82 वर्षांचा पुरुष, तासगाव येथील 75 वर्षांचा पुरुष, आरवडे येथील 52 वर्षांचा पुरुष,खंडेराजुरी येथील 36 वर्षांची महिला, बालेगाव येथील 60 वर्षांचा पुरुष, जत येथील 46 वर्षांचा पुरुष, बामनोली येथील 38 वर्षांचा पुरुष असा आहे.
आज अखेर तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. आटपाडी 172, जत 193, कडेगाव 83, कवठेमहांकाळ 156, खानापूर 75, मिरज 328,पलूस 151,शिराळा 211, तासगाव 121,वाळवा 167,मनपा 2542 असे आजखेरची रुग्णसंख्या आहे.