मॅंचेस्टर –वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक कसोटीत दोन्ही डावांत मिळून 10 गडी बाद केलेल्या इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने जागतिक कसोटी क्रमवारीत तिसरे स्थान पटकावताना मोठी झेप घेतली आहे. या क्रमवारीत या सामन्यापूर्वी ब्रॉड 10 व्या स्थानावर होता.
तीन कसोटी सामन्यांची ही मालिका यजमान इंग्लंडने 2-1 अशी जिंकताना निर्णायक लढतीत वेस्ट इंडिजचा मोठा पराभव करत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही आपली गुणसंख्या वाढवली. आता त्यात ब्रॉडला अखेरच्या कसोटीत दोन्ही डावांत मिळून 10 गडी बाद करण्यात यश आले व त्याच्या कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने ही मलिकाही जिंकली.
करोनानंतर प्रथमच सुरू झालेली मालिका जिंकण्याची कामगिरीही इंग्लंडच्याच नावावर नोंदली गेली आहे. ब्रॉडने या कामगिरीसह कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी घेण्याचीही कामगिरी नोंदवली. अशी कामगिरी करणारा ब्रॉड जेम्स अँडरसन याच्यानंतरचा इंग्लंडचा केवळ दुसराच वेगवान गोलंदाज ठरला आहे.