लखनौ – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी आज अयोध्येला भेट देऊन तेथील भूमीजन तयारीचा आढावा घेतला तसेच त्यांनी रामजन्मभूमी मंदिराच्या जागेवरील आसनावर लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या मूर्ती विराजमान केल्या.
आज दुपारी त्यानिमित्त तेथे पुजा झाली. अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राम मंदिराचा भूमीपूजन सोहोळा होणार आहे. त्याची सध्या तेथे जोरदार तयारी सुरू आहे.
या मुख्य कार्यक्रमाविषयी बोलताना मंदिराच्या ट्रस्टींपैकी एका ट्रस्टींनी सांगितले की देशातील सध्याची करोनाची साथ लक्षात घेऊन या कार्यक्रमाला केवळ दोनशे जणांनाच निमंत्रित केले जाणार आहे. त्या ठिकाणी सोशल डिस्टंन्सिग तत्त्वाचेही योग्य ते पालन केले जाणार आहे. दरम्यान योगींनी अयोध्येतील कारसेवक पुरमलाही भेट दिली.