मुंबई – अभिनेते सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी यशराज फिल्म्स कंपनीचे प्रमुख आदित्य चोप्रा यांचा जबाब आज नोंदवला. त्यांना त्यासाठी आज वर्सोवा पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले होते. तेथे चार तासांच्या जाबजबाबानंतर त्यांना घरी जाऊ देण्यात आले.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास विविध अंगांनी केला जात असून या प्रकरणाशी संबंधित सर्वांनाच पोलीस चौकशीसाठी बोलावले जात आहे. तथापि, इतके जबाब नोंदवूनही सुशांतसिंह याच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र अजून समजू शकलेले नाही.
सुशांतसिंह याने आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवलेली नाही. या संबंधात यशराज फिल्मस कंपनीचे कासिंटग डायरेक्टर शानू शर्मा यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. एकूण 34 जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत.