कोलकाता – आयपीएल स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत खेळवता यावी यासाठी आता इंग्लंडविरुद्धची मालिका रद्द करण्यात आल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिकादेखील एक आठवड्याने लांबणीवर टाकण्यात येणार असल्याचे संकेत बीसीसीआयकडून मिळत आहेत.
ही मालिका 3 डिसेंबरपासून सुरू होणार होती. मात्र, आता त्यात बदल करण्यात आला असून या मालिकेतील पहिल्या सामन्याला 10 डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघ 14 दिवसांऐवजी 7 दिवस विलगीकरणात राहणार असून त्यानंतर 2 सराव सामनेही खेळणार आहे. विलगीकरणाचा कालावधी कमी असावा अशी अपेक्षा गांगुली यांनी केली होती.