ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर यांचे आवाहन
पुणे – महाराष्ट्रात करोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. त्यातल्या त्यात मुंबई, पुणे येथे करोनाचा जास्त प्रभाव आहे. यामुळे शासनाने दहा दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेऊन स्वत:ला “करोना योद्धे’ समजून हा लॉकडाऊन यशस्वी करावा, आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर यांनी केले आहे.
पुणे येथील एनआयव्ही या संस्थेला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. शासनाने घेतलेल्या या लॉकडाऊन कालावधीत प्रत्येकाने हात स्वच्छ धुऊन मास्कचा वापर करावा. लॉकडाऊन मोडणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर घरातील कुठल्याही व्यक्तीला ताप व श्वसनाचा त्रास झाला तर पुढे येऊन तपासणी केली पाहिजे. प्रत्येक डॉक्टर, सुरक्षा कर्मचारी हे आपल्यासाठी सेवा देत आहेत, असेही डॉ.गंगाखेडकर म्हणाले.