भोर -तालुक्यातील 12 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे दोन दिवसांपूर्वी पाठवले होते. त्यातील 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे, गट विकास आधिकारी विशाल तनपुरे आणि मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी दिली.
भोर शहरातील 1, नाझरे येथील 1 आणि साळवडे येथील 2 रुग्णांचा समावेश असून, या चारही रुग्णांना पुढील उपचारासाठी पुणे येथे दाखल केले आहे. भोर तालुक्यात आजअखेर करोनाबाधित रुग्णांची संख्या 32 असून, सद्यःस्थित 18 बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान करोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.