बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो केवळ ३४ वर्षांचा होता. नैराश्यामुळे सुशांतने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.
#JusticeForSushantSinghRajput
According to report sushant 10 bje juice pi ke room mai gye fir 8:59 mai hi Wikipedia kaise update ho gya ki unhone suicide kiya it’s well planned murder.. #CBI @narendramodi @pmo @AmitShah @rashtrapatibhvn @PMOIndia @rajnathsingh
CBI pic.twitter.com/3pc9Hb0ZZ8— rohit singh (@rsi37246971) June 30, 2020
यानंतर सुशांतच्या मृत्यूची चौकशी सीबीआय, एनआयए, ईडी आणि प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या विशेष तपास पथकाने करावी, अशी मागणी केली जात आहे तर , दुसरीकडे एक चकित करणारा प्रकार विकिपिडिया पेजच्या माध्यमातून समोर आला आहे. सुशांतच्या मृत्यूपूर्वीच त्याच्या विकिपिडिया पेजवर त्याला मृत घोषित केलं होतं. असा दावा सोशल मीडियाव्दारे केला जात आहे.
पोलिसांच्या रिपोर्टनुसार सुशांतने १०च्या आसपास फळांचा रस घेतला होता. त्यानंतर एक दिड तासांनी त्याने आत्महत्या केली. परंतु चकित करणारी बाब म्हणजे त्याच्या विकिपिडिया पेज वर नऊ वाजताच कोणीतरी सुशांतचा मृत्यू झाल्याचं लिहिलं होतं. सुशांतचा मृत्यू होणार आहे हे कोणाला माहित होतं? हा प्रश्न सोशल मीडियाद्वारे आता पोलिसांना विचारला जात आहे. सुशांतच्या आत्महत्येची चौकशी CBI ने करावी अशी मागणी देखील केली जात आहे.