जळोची – बारामती शहरातील अर्बनग्राम येथील एका 22 वर्षीय आयटी इंजिनियरला करोनाची लागण झाली आहे. हा तरुण काही दिवसांपासून “वर्क फ्रॉम होम’ करीत होता; मात्र पुणे येथे होमिओपॅथी औषध उपचारासाठी गेल्याने दरम्यानच्या प्रवासातच बाधा झाल्याचा संशय आहे.
संबंधित तरुण 21 जून रोजी पुणे येथील निगडी येथे गेला होता. पुन्हा बारामतीला आल्यानंतर त्यास सर्दीचा त्रास जाणवल्याने त्याने बारामती येथील रुई ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली असता पॉझिटिव्ह आढळला. त्यास सध्या रुई येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, त्यांच्या संपर्कातील सहा जणांची करोनाची तपासणी करण्यात येणार आहे.