बॅंक व्यवस्थापक आणि संगणक अभियंता चालवत होते सेक्स रॅकेट
पुणे(प्रतिनिधी) – चुतुश्रृंगी पोलिसांनी एका ऑन लाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यातील प्रमुख आरोपी एका बॅंकेत सहायक बॅंक व्यवस्थापक तर दुसरा संगणक अभियंता म्हणून काम करत आहे. त्यांनी स्विट सर्व्हिसेस एस्कॉर्ट नावाने वेबसाईट उघडली होती. पोलिसांनी रो हाऊस मालकासह चौघांना अटक केली आहे.
सुरेश प्रल्हाद रणविर (वय 35,रा.बाणेर, मुळ हातगाव, नांदेड), रो हाऊस मालक नाकसेन रामदास गजघाटे( वय 52,रा.बावधान), रविकांत बालेश्वर पासवान( वय 34,रा.सुस , मुळ बिहार), दिपक जयप्रकाश शर्मा (वय 36,रा.बालेवाडी, मुळ ओरिसा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील रविकांत पासवान हा बॅंक ऑफ बडोदा मुरूम( जि.पुणे) येथे सहायक बॅंक व्यवस्थापक म्हणून काम करतो. तर जयप्रकाश शर्मा हा संगणक अभियंता आहे. त्यांची एक महिला साथीदार फरार झाली आहे.
हा सर्व प्रकार ओयो हॉटेल रो हाऊस नंबर 1 पाषाण टेकडीलगत, धनकुडे वस्ती येथे सुरु होता. त्यांच्या ताब्यातून 11 मोबाईल, चार लॅपटॉप, एक आयपॅड आणि व्यवसायासाठी वापरण्यात येणारी टाटा सफारी गाडी हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त सुनिल फुलारी, पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे करत आहेत.