पुणे -पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत करोनाबाधितांची संख्या 20 हजार 416 इतकी झाले आहे. यातील 12 हजार 639 करोना रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
सध्या ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 6 हजार 909 इतकी आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 61.91 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.25 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.