नगर -करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक व शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागास सॅनिटायझर स्टॅण्ड भेट दिले. प्रभारी शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांच्याकडे हा स्टॅण्ड सुपुर्द केला.
यावेळी बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, मुख्याध्यापक काळे, सुनिल झाडे, उपस्थित होते. माध्यमिक शिक्षण विभागात अधिकारी व कर्मचारी कार्यरत असतात. विविध कामे घेऊन जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या विभागात येत असतात. करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शिक्षकांना सॅनिटायझरची गरज भासत असते. यासाठी या विभागास सॅनिटायझर स्टॅण्ड भेट देण्यात येत असल्याची भावना बोडखे यांनी व्यक्त केली.