कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी विठ्ठल आटुगडे पळाला होता. आपत्तकालीन कारागृहातील गेटचे तो काम करताना पळाला. कैद्याला पकडण्यासाठी पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर कैद्यान दगडफेक केली.
कळंबा कारागृहातून पलायन केलेल्या कैद्यास शेंडा परिसरातून कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जीवाची बाजी लावत अवघ्या अर्ध्या तासात पकडलं आहे. निर्जन स्थळाचा आधार घेत शहराबाहेर पडण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या कैद्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केलीय. पाळण्याचा प्रयत्न फसलेला विठ्ठल आटुगडे हा कैदी सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याल मेनी गावाचा रहिवाशी आहे.