मुंबई – बॉलिवूडमध्ये एका वर्षात सर्वाधिक चित्रपट करणारा अभिनेता म्हणून ‘अक्षय कुमार’कडे पाहिलं जातं आणि त्यावरून त्याच्या वर्षभराच्या कमाईची चर्चा सुद्धा होते. अक्षय किमान एका महिन्यात आपल्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करत असतो.
दरम्यान, आता पुन्हा एकदा अक्षय चर्चेत आला आहे. नुकतंच फोर्ब्स मासिकानं जगभरातील सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रेंटीची यादी जाहीर केली असून, मागच्या वर्षीप्रमाणं यंदाही अक्षयनं पहिल्या 100 श्रीमंत सेलिब्रेटींच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
The reality TV star, Kylie Jenner, ranked No. 1 on this year’s #Celeb100 list https://t.co/XLCKY8jVab pic.twitter.com/lxeam2IpfW
— Forbes (@Forbes) June 4, 2020
या यादीत जून 2019 ते मे 2020 या काळातील जगातल्या पहिल्या 100 सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. ज्यात एकमेव भारतीय सेलिब्रेटी अक्षय कुमारचा समावेश आहे. या यादीत अक्षय कुमार USD 48.5 मिलियन म्हणजे भारतीय 366 कोटींच्या कमाईसह 52 व्या क्रमांकावर आहे. तर कायली जेनर USD 590 मिलियन म्हणजे भारतीय 4,453 कोटींसह पहिल्या क्रमांकावर आहे.
Announcing: The #Celeb100 2020 https://t.co/NGF2KrRn06 pic.twitter.com/mpBKd8BuVu
— Forbes (@Forbes) June 4, 2020