मुंबई – बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीच्या संगीतकार जोड्यांपैकी एक असलेल्या साजिद-वाजिद जोडीतील ‘वाजिद खान’ यांचं मुंबईतील चेंबूर येथील रुग्णालयात निधन झालं आहे. ते 42 वर्षांचे होते.वाजिद खान व्हेंटिलेटरवर होते. रविवारी दुपारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि त्यातच त्यांचं निधन झालं. वाजिद यांना किडनीचा तसेच हृदयविकाराचा त्रास होता. आठवडाभरापूर्वीच त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
दरम्यान, वाजिद खान ज्या रुग्णालयात उपचार घेत होते. तेथील रूग्णलयात उपचारादरम्यान त्यांनी गायलेल्या गाण्याचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1229265437413159/
वाजिद यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूड जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक कलाकारांनी त्याला ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे.