चेन्नई – करोनावर स्वत:च विकसित केलेले औषध प्राशन केल्याने एका आयुर्वेदिक औषध कंपनीचा व्यवस्थापक आणि फार्मसिस्ट मरण पावला. ही धक्कादायक घटना चेन्नई येथे घडली.
चेन्नईतील सुजाता बायोटेक या कंपनीत सिवानेसन हा कार्यरत होता. तो आणि कंपनीचे मालक राज कुमार यांनी कोरोनावर औषध शोधले. या औषधात त्यांनी प्रथमच सामान्य औषधात वापरली जाणाऱ्या रासायनिक द्रव्यांचा वापर केला. त्याचा पहिला वापर राज कुमार यांच्यावर केला. त्यात असणाऱ्या सोडियम नायट्रेटमुळे ते बेशुध्द पडले. मात्र त्याची मात्रा कमी असल्याने ते लगेच शुध्दीवरआले. सिवासेवन यानेही ते औषध घेतले मात्र तो शुध्दीवर आला नाही. त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्यात त्यांचा मृत्यू झाला.