मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी करोनावर मात केली आहे.
आनंद परांजपे यांना राष्ट्रवादीच्या एका नेत्याच्या संपर्कात आल्याने करोनाची लागण झाली असल्याचे सांगितले जात आहे. करोनाची लागण झाल्याने आनंद परांजपे आणि त्यांच्या पत्नी सोनल परांजपे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी रात्री आनंद परांजपे आणि त्यांच्या पत्नी सोनल परांजपे यांना होरायझन रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला.
दरम्यान, देशात करोनाचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मंगळवारी महाराष्ट्रात एका दिवसात ७२९ नवे रुग्ण सापडले. यानंतर महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या ९ हजार ३१८ झाली आहे. केवळ मुंबईत करोनाग्रस्तांचा आकडा ५ हजार ९८२ वर पोहोचला आहे.