नगर -जामखेड येथील कोरोना रुग्णाच्या संख्येत आज आणखी 2 व्यक्तींची भर पडली. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी या व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकट्या जामखेड शहरातील बाधीत रुग्णांची संख्या आता 14 झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात करोनाचा फैलाव वाढतच चालला असून, या मुलांच्या संपर्कात आलेल्या एकाला करोनाची लागन झाली असल्याचे रात्री वैद्यकीय अवहालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या 40 वर पोहचली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.
बुधवारी करोना बाधीत आढळलेल्या 2 व्यक्तींचे हे दोन्ही मित्र असून त्यांना लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. आज बाधीत आढळलेल्या व्यक्तींपैकी एक जण 23 वर्षाचा तर दुसरा 16 वर्षाचा असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली. त्यानंतर काल त्या दोन व्यक्तींपैकी एकाच्या वडिलांना तर आज त्यांच्या दोन मित्रांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे रविवारी (दि.19) रोजी पाठविलेल्या अहवालापैकी दोन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे दोन्ही बाधित काही दिवसांपूर्वी मृत्यू पावलेल्या रुग्णाची मुले आहेत. गुरुवार (दि.23) रोजी जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या अहवालापैकी एक जामखेड येथील 2 तर संगमनेर येथील 4 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच रात्रीउशीरा जामखेड येथील आनखी दोन रुग्ण आढळून आल्याने करोनाचा पुन्हा सिलसीला सुरु झाला आहे.