सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील एका संशयिताचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, असून विविध विलगीकरण कक्षात १२ संशयितांना दाखल करण्यात आले आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असणाऱ्या एका संशयिताचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे. तसेच काल रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात २ व कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात १० अशा १२ जणांना संशयित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.