अभिनेत्री ईशा गुप्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती सतत तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.रिपोर्ट्सनुसार,इशा स्पॅनिश-उद्योजक मॅन्युएल केम्पेस गुलारला डेट करत आहे. नुकतेच अभिनेत्रीने तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे.
ईशा आणि मॅन्युएल जवळपास पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘लग्न कधीही होऊ शकते. मी सध्या माझ्या आरोग्याकडे अधिक लक्ष देत आहे. वेळ आल्यावर मी लग्न करेन आणि मुलंही करेन. मला नेहमीच मुलं हवी होती.’
या संभाषणादरम्यान, 38 वर्षीय अभिनेत्रीने हे देखील उघड केले की तिने 2017 मध्येच मी एग फ्रीज केले होते. ती पुढे म्हणाली, ‘जर मी अभिनेत्री नसती तर या काळात मला तीन मुले झाली असती, ज्यामुळे माझे वजन वाढले असते. तुमच्या शरीरात बदल होतातच, पण त्याचबरोबर तुम्हाला आनंदही मिळतो.’
मॅन्युएलच्या नात्याबद्दल खुलासा करतांना ती म्हणाली,’2019 मध्ये मॅन्युएलला भेटण्यापूर्वी मी सुमारे तीन ते साडेतीन वर्षे अविवाहित होती. आम्हाला सुरुवातीपासूनच माहीत होते की आम्ही आमच्या नात्याबद्दल गंभीर आहोत. असं म्हणत तिने नात्याबाबत खुलासा केला.
अभिनेत्रीची आगामी चित्रपट
ईशा गुप्ताने ‘राज 3डी’, ‘गोरी तेरे प्यार में’, ‘हमशकल्स’, ‘बेबी’, ‘रुस्तम’, ‘टोटल धमाल’, ‘पलटन’ आणि ‘बादशाहो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री शेवटची वेब सीरिज ‘आश्रम’मध्ये दिसली होती. तिच्या आगामी कामांबद्दल बोलायचे झाले तर, ती ‘हेरा फेरी 4’, ‘देसी मॅजिक’ आणि ‘मर्डर 4’ मध्ये अभिनय करताना दिसणार आहे. मात्र, निर्मात्यांकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.