वॉशिंग्टन : जगभर करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असताना अमेरिकेत उद्योग व्यवसायानिमित्त गेलेल्या शेकडो भारतीयांसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. “एच1=बी’ व्हिसाधारकांनी मुदतवाढीसाठी केलेल्या अर्जानुसार व्हिसाला मुदतवाढ देण्याचा निर्णय अमेरिकेच्या प्रशासनाने घेतला आहे.
अमेरिकेतील कंपन्या “एन 1-बी’ व्हिसाद्वारे विदेशी कर्मचारी अमेरिकेतील वास्तव्याची परवानगी दिली जाते. हे कर्मचारी तांत्रिक आणि बौद्धिक क्षेत्रातील तज्ञ असणे गृहित धरले गेलेले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या दर वर्षी हजारो भारतीय युवकांना या व्हिसाच्या आधारे अमेरिकेत नोकरीची संधी देत असतात.
सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये प्रवास बंदी लागू असल्याने अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या अनेकांना व्हिसाची मुदत संपत आली असतानाही मायदेशी परत जाणे शक्य नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊन “एच 1-बी’ व्हिसाला मुदतवाढ देण्याचा निर्णय अमेरिकेच्या “होमलॅन्ड सिक्युरिटी’ विभागाने परवानगी दिली आहे.