मुंबई – करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी कायदा लागू असून मुस्लिम बांधवांनी ‘शब-ए-बारात’चा सण घरीच साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले होते. यानिमित्ताने नमाजपठणासाठी धार्मिक स्थळी जमू नये तसेच प्रत्येकाने आपापल्या घरी राहून नमाज, कुराण पठण करावे व घरातल्या घरात हा सण साजरा करावा असे आवाहनही करण्यात आले होते .
Wah ! Thank u for listening n understanding the gravity of this situation the country is in . God bless n protect each n every 1 . .#IndiaFightsCorona pic.twitter.com/xjHXfWA8lX
— Salman Khan (@BeingSalmanKhan) April 9, 2020
यातच गुरुवारीही देशभरातील अनेक मुस्लीम धर्मियांनी त्यांच्या शब-ए-बारात या सणाला घरात राहण्याला प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे अभिनेता सलमान खान याने बंद असलेल्या मशिदींचा फोटो टाकून तमाम मुस्लीम धर्मियांना धन्यवाद दिले आहेत. देशाच्या सध्याच्या परिस्थितीला समजून घेण्यासाठी आणि त्यानुसार पालन करण्यासाठी धन्यवाद. परमेश्वर प्रत्येकाला सुरक्षित ठेवो, अशा शब्दात सलमानने मुस्लीम धर्मियांचे कौतुक करत आभार मानले आहेत.
याआधी सलमानने एक व्हिडीओ शेअर करून लोकांना घरातच राहण्याचं आवाहन केलं होतं. गेले तीन दिवस मी माझ्या फार्महाऊसवरच अडकून आहे. माझे वडील सलीम खान हे घरात एकटेच आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून मी माझ्या वडिलांना पाहिलेलं नाही. पण कोरोनाला रोखण्यासाठी आहोत त्या जागी राहणंच उत्तम असल्याचं सांगत सलमानने लोकांनाही घरीच राहण्याचं आवाहन केलं होतं.