जयपूर : कोरोना विषाणूविरूद्ध वैद्यकीय कर्मचारी 24 तास सेवा देत आहेत. कोरोनाला पराभूत करणे आणि रुग्णांना बरे करणे हे त्यांचे एकमेव लक्ष्य आहे. असेच एक डॉक्टर म्हणजे राममूर्ती मीना. डॉ. मीना राजस्थानमधील करौली जिल्ह्यातील रानौली गावाचे रहिवाशी आहेत. त्यांच्या आईचे सोमवारी निधन झाले. त्यांना आपल्या आईचे निधन झाल्यानंतरही अंत्यसंस्कारात सहभागी होता आले नाही.
त्यांनी व्हिडीओ कॉल करूनच आपल्या आईचे अंत्यदर्शन घेतले. आपल्या आईची दिलगिरी व्यक्त करताना ते म्हणाले, ‘आई, मला वाईट वाटते की, मी तुझे अंत्यसंस्कार करू शकलो नाही. डॉ. मीना, रात्रंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या सेवेत व्यस्त आहेत. त्यांना आपल्या कर्तव्यपाई आईच्या अंत्यसंस्कारात सहभागी होता आले नाही.
डॉ. मीना म्हणाले, कोरोना बाधितांची सेवा करणे हे माझे पहिले कर्त्यव्य आहे. आपण सर्वानी एकत्र येऊन कोरोना विषाणूची लढा द्यावा. माझे पत्नी आणि मुलं सर्व गावाकडे आहेत. माझ्या वडिलांनी मला सांगितले कि, आमच्या पेक्षा कोरोना बाधितांना तुझी जास्त गरज आहे. कोरोना बाधितांची चांगली सेवा कर. तुला दुःख व्यक्त न करता कोरोना रुग्णाची सेवा करायची आहे. परिवाराने दिलेल्या पाठिंब्यामुळे मला बळ मिळाले असून मी कोरोना बाधितांची सेवा करीत असल्याचे डॉ. मीना म्हणाले.