नागपूर/यवतमाळ : नागपूर शहरात आणखी एकाला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापाठोपाठ यवतमाळमध्ये दोन जणांना बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे राज्यातील बाधीतांची संख्या 22वर पोहोचली आहे.
यवतमाळमध्ये बाधा झालेले दोघेही नुकतेच दुबईला जाऊन आले होते. त्यांच्यासमवेत दुबईला गेलेल्या नऊ जणांपैकी अन्य सात जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. डी सिंह यांनी दिली.
त्यामुळे महाराष्ट्रात बाधा झालेल्यांची संख्या 22 वर पोहोचली आहे. बाधा झालेल्या 10 जणांवर पुण्यात, मुंबई आणि नागपूरमध्ये प्रत्येकी चार, यवतमाळमंध्ये दोन, ठाणे आणि अहमदनगरमध्ये प्रत्येकी एकावर उपचार सुरू आहेत. भारतातील बाधीतांची संख्या 85वर पोहोचली आहे. केरळ पाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक बाधीत आहेत. भारतात दोन जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.