शिक्रापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने मला पक्षातून काढून टाकल्याचे पत्र आज प्रसिद्ध केले आहे, परंतु त्या बाबत मला काहीही वाटत नसून वेळ आली तर आपण स्वतःचा पक्ष स्थापन करू असे मंगलदास बांदल यांनी सांगितले.
मंगलदास बांदल यांनी पुण्यातील एका नामांकित सोने व्यापाऱ्याला पन्नास कोटींची खंडणी मागितली होती . मंगलदास बांदल यांची चौकशी सुरु असतानाचे वृत्त प्रसारित होताच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी बांदल यांना पक्षातून निलंबित करण्यात येत आहे असे म्हटले आहे.
याबाबत बोलताना बांदल म्हणाले, पक्षाच्या या पदा बाबत आपल्याला काही वाटत देखील नव्हते, आणि त्या पदाचा आपण कधी विचार देखील केलेला नव्हता. तसेच ते पद आपल्याला नको होते. परंतु पक्षाने लोकसभा निवडणुकी दरम्यान उमेदवार निवडून आणण्यासाठी आपल्याला ते पद दिले होते.
त्यांनतर मी राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार देखील निवडून आणला. मी पक्षात असलो नसलो तरी मला काहीही फरक पडत नाही. आणि जर वेळ आली तर स्वतःचा पक्ष काढेल, असे मंगलदास बांदल यांनी जाहीर केले आहे.