नगर – करोना विषाणूच्या संसर्गाचा अद्याप जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, जे नागरिक परदेशातून आले आहेत, त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. परदेशात कामानिमित्त किंवा सहलीसाठी जाऊन आलेल्या नागरिकांनी त्यांच्या जवळच्या ग्रामीण रुग्णालयात अथवा जिल्हा रुग्णालयात त्यांची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व टूर्स ऍन्ड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी प्रवाशांची यादी जिल्हा प्रशासनाकडे द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि पूर्वकाळजी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात यापूर्वीच जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने सकारात्मक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व टूर्स ऍन्ड ट्रॅव्हल्स कंपन्या तसेच चित्रपटगृहांचे मालक – व्यवस्थापकांची बैठक घेवून यासंदर्भात त्यांना सूचना देण्यात आल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे आदी यावेळी उपस्थित होते. द्विवेदी यांनी या टूर्स ऍन्ड ट्रॅव्हल्स कंपन्यांना करोना संदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
तसेच परदेशातून या विषाणूचा शिरकाव देशात झाल्यामुळे परदेशातून येणाऱ्या तसेच परदेशात सहलीसाठी गेलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे जिल्ह्यात परत आल्यानंतर अशा नागरिकांची आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे. यादृष्टीने अशा सहली आयोजित करणाऱ्या कंपन्यांना ती नावे जिल्हा प्रशासनाकडे कळवावीत. तसेच त्यांच्या पातळीवरुनही संबंधितांना आरोग्य तपासणी करण्याबाबत अवगत करावे, अशा सूचना दिल्या. सध्या दुबईहून आलेल्या 4 जणांचे नमुने पुण्यात चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मात्र, आतापर्यंत जिल्ह्यात कोणत्याही नागरिकास या विषाणूची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत.
त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे तसेच कोणत्याही अफवेला बळी पडण्याचे कारण नाही. परदेशातून आलेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचीही तपासणी करण्यात आली असून त्यांच्यातही अशी लक्षणे आढळली नाहीत, तसेच, असे कोणी नागरिक बाहेरुन आले असतील तर त्यांनीही स्वतःची आरोग्य तपासणी करुन घ्यावी. नगर येथे करोना नियंत्रण कक्ष स्थापन ( 0241-2431018 ) करण्यात आला असून तो 24 तास कार्यरत आहे. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा 1077 या टोल फ्री क्रमांकालवरुन नागरिकांना मूलभूत माहिती दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
करोनावर या ठिकाणी होणार उपचार
प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा रुग्णालय, बूथ हॉस्पिटल येथे स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. याशिवाय, शिर्डी येथील साई संस्थानचे हॉस्पिटल आणि शनि शिंगणापूर येथील देवस्थानचे हॉस्पिटल येथेही व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांनी स्वताहून काही बाबतीत काळजी घेण्याची गरज आहही घ्यावी काळजी
श्वसनसंस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घेणे. हात नियमितपणे साबणाने स्वच्छ धुवावेत.
शिंकताना, खोकताना नाकातोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपर धरणे, अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये. फळे, भाज्या न धूता खाऊ नयेत. हस्तांदोलन टाळावे. चेहरा, नाक यांना वारंवार हाताने स्पर्श करु नये. गरज नसताना गर्दीचे ठिकाणी जाणे टाळा, नियमबध्द जीवनशैलीचा अवलंब करा. स्वत:हून कोणताही उपचार करु नये, डॉक्टराच्या सल्ल्यानुसारच उपचार घ्यावे.े.
करोनावर या ठिकाणी होणार उपचार
प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा रुग्णालय, बूथ हॉस्पिटल येथे स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. याशिवाय, शिर्डी येथील साई संस्थानचे हॉस्पिटल आणि शनि शिंगणापूर येथील देवस्थानचे हॉस्पिटल येथेही व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांनी स्वताहून काही बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे.