शहरात गारवा अन् ढगाळ हवामान
पुणे – गेले दोन ते तीन दिवसांपासून शहरात असणारे ढगाळ वातावरण आणखी काही दिवस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. ढगाळ हवामानात विषाणूंचा प्रसार हा अधिक होत असतो. त्यामुळे शहराच्या दृष्टीने आगामी तीन दिवस हे महत्वाचे असणार आहेत.
पुणे शहरात सध्या करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. हा व्हायरस अती उष्ण तापमानात टिकत नाही. पण, सध्या ढगाळ वातावरणामुळे उन्हाचे चटके जाणवत नसून या उलट गारठा वाढला आहे. शहरातील आज कमाल तापमान हे 31 अंश सेल्सिअस नोंदविले गेले असले तरी दुपारच्यावेळात काही काळ ढगाळ वातावरण सुद्धा होते.
त्याचबराबेर किमान तापमान सुद्धा 14.7 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरले आहे. दोन्ही तापमानातील तफावत खूप आहे. त्यामुळे सध्या हे वातावरण विषाणूजन्य रोगांसाठी पोषक असल्याने सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.
त्याचबरोबर येत्या तीन दिवसांत वातावरणात बदल होऊन उन्हाची तीव्रता वाढेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.