होळीच्या निमित्ताने कित्येक ऍक्टर आणि सेलिब्रिटी होळीच्या पार्टीचे आयोजन करतात. खुद्द अमिताभ बच्चनही काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या बंगल्याच्या आवारात होलीपार्टीचे आयोजन करत असायचे. अजूनही बरेचजण अशा पार्टीच्या आयोजनातून होळीचा आनंद द्विगुणित करत असतात.
देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि तिचा नवरा निक जोनास यांनीही यावेळी होळीच्या पार्टीचा आनंद घेतला. पण नेहमीपेक्षा ही पार्टी वेगळी होती. कारण या पार्टीमध्ये रंगांची आतषबाजी तर झाली होतीच, त्याबरोबर भरपूर भांगही पाजली गेली होती. या पार्टीतला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये प्रियांका आणि निक दोघेही भांग पिताना दिसत आहेत.
प्रियांकाला भांगेची नशा एवढी चढली होती, की ती गाण्याच्या तालावर चक्क डुलत डुलत नाचताना दिसत होती. प्रियांका आणि निकचे जवळचे मित्रही या पार्टीमध्ये नशेत चूर झाले होते. या व्हिडीओमध्ये निक “मी देखील थोडी भांग प्यायलो आहे.’ असे म्हणताना दिसतो आहे. मुंबईत झालेल्या या पार्टीनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी निक आणि प्रियांका अमेरिकेला रवाना झाले. अलिकडेच “द स्काय इज पिंक’ हा प्रियांकाचा सिनेमा रिलीज झाला होता. त्यात तिच्या बरोबर फरहान अख्तर आणि जायरा वसिम हे लीड रोलमध्ये होते.