करोना व्हायरस, येस बॅंक प्रकरण व क्रुड कोसळल्याचा परिणाम
मुंबई : देशातील करोना व्हारस बाधीत रुग्नाची संख्या वाढत आहे. तेल उत्पादक देशातील भांडणामुळे क्रुडचे दर कोसळले. येस बॅंक प्रकरण वाढले आहे.
त्यामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारातसह जागतिक शेअर बाजार निर्देशांकांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी भारतामध्ये कंपन्यांचे भांडवली मूल्य एकाच दिवसात जवळजवळ 6.84 कोटी रुपयांनी कमी झाले. मंगळवारी शेअर बाजाराना सुटी होती.
मात्र फेडरल रिझर्व आणि युरोपियन सेंट्रल बॅंकेसह जगभरातील सर्व बॅंकांनी या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी भांडवल सुलभता उपलब्ध करण्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही तासातच उद्योगासाठी काही सवलती जाहीर करणार असल्याचे जाहीर केले.
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी करोना व्हायरस बाधीत ऊहान प्रांताला भेट दिली आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती आता वेगाने पूर्ववत होत असल्याचे संकेत मिळत आहेत. या कारणामुळे मंगळवारी जागतिक शेअर बाजाराची घसरण थांबली आणि काही प्रमाणात निर्देशांकात वाढ झाली.
क्रुडच्या दरातही ही थोडीफार वाढ झाली असल्याचे दिसून आले. उत्पादन कपातीवर सौदी अरेबिया आणि रशियाचे भांडण वाढल्यानंतर काल जागतिक बाजारात क्रूड चे दर 10 टक्क्यांनी कमी झाले होते आणि क्रूडचा दर प्रति पिंपाला 31 डॉलरपर्यंत कमी झाला होता. मात्र आज या दरामध्ये थोडीफार सुधारणा झाली असल्याचे दिसून आले
दोन दिवसात 10 लाख कोटी रुपयांचे नुकसान
होळी निमित्त मंगळवारी शेअर बाजाराचे कामकाज झाले नाही.
मात्र सोमवारी आणि शुक्रवारी दोनच दिवसात शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात कोसळल्यामुळे भारतातील कंपन्यांच्या भांडवली मूल्यात 10 लाख कोटी रुपयांची घट झाली. सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1942 अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टि 538 अंकांनी कोसळला. मंगळवारी भारतीय शेअर बाजार जरी बंद असले तरी जागतिक शेअर बाजारातील संकेतानुसार परिस्थिती सुधारू लागली आहे.
मात्र तरीही जोपर्यंत करोना व्हायरस बाबत स्पष्ट परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत शेअरबाजारात अनिश्चितता राहण्याची शक्यता असल्याचे ब्रोकर्स सांगितले.