मुंबई : करोना विषाणुंच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आपण आता कोणाशीही हस्तांदोलन करण्याऐवजी केवळ नमस्ते करीत आहोत असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात करोनाची अद्याप एकही केस आढळून आलेली नसली तरी देशात करोनाच्या 39 केसेस आढळून आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी म्हटले आहे की, मला स्वच्छता आवडते, घाण अजिबात आवडत नाही.
मला हस्तांदोलन करण्यासाठी आलेल्यांची हस्तांदोलन टाळून मी त्यांना पारंपारीक पद्धतीने नमस्ते करतो. काही जणांना असे वाटू शकते की आता मी उपमुख्यमंत्री झालो असल्याने आता मी हस्तांदोलन टाळत आहे, पण तसे नाही.
केवळ दक्षतेसाठीच आपण आता हस्तांदोलनाऐवजी नमस्ते करीत आहोत.या रोगाचा फैलाव पुर्ण पणे थांबेपर्यंत सर्वांनीच हस्तांदोलन टाळले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.