बॉलीवूडमधील बीग बी अर्थात अभिनेता अमिताभ बच्चन लवकरच आपल्या आगामी “ब्रह्मास्त्र’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अमिताभसोबत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहेत.
दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचा हा चित्रपट 2020मधील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक असून याची प्रेक्षक खूपच आतूरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटसृष्टीतील हे तीन आघाडीचे कलाकार प्रथमच एकत्रित काम करत आहेत. काही दिवसांपूर्वीच बिग बीने रणबीरसोबतच्या दोन वेगवेगळया चित्रपटांवर सेट केलेली ‘then and now’ पिक्चर शेअर केली होती. ज्याची खुद्द रणबीरनेही खूप स्तुती केली होती.
आता सीनियर बच्चनने आलियासोबतचा एक नवीन फोटो शेअर केला आहे. या फोटोची सर्वत्र चर्चा होत आहे. या फोटो दोन्ही कलाकार एकमेकांची गळाभेट घेताना दिसतात. सेटवरील हा फोटो शेअर करत बिग बी म्हणाले, ती खुपच टॅलंटेड आहे.
दरम्यान, “ब्रह्मास्त्र’मध्ये अमिताभ, रणबीर आणि आलियासह नागार्जुन, डिंपल कपाडिया आणि मौनी रॉय यासारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. तसेच किंग खान अर्थात शाहरुख खाननेही या चित्रपटात एक स्पेशल भूमिका साकारली आहे. हा चित्रपट या वर्षाअखेर प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे.