नवी दिल्ली – दिल्लीच्या शाहीन बागेत आज (दि. 1) सकाळपासूनच ‘कलम 144’ लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि एनआरसीच्या निषेधार्थ दिल्लीत गेले अनेक दिवस जोरदार आंदोलने होत आहे. दरम्यान, या उफाळलेल्या हिंसाचारात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काही नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.
Joint Commissioner DC Srivastava at Delhi’s Shaheen Bagh: As a precautionary measure, there is heavy police deployment here; Our aim is to maintain law and order and prevent any untoward incident from occurring. https://t.co/Wh9ONK0LgI pic.twitter.com/OsL4Geqz0D
— ANI (@ANI) March 1, 2020
दरम्यान, या याचपर्शभूमीवर आज दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच, यावेळी पोलिसांकडून शाहीन बागेत एक बॅनरही लावण्यात आलं आहे. ज्यात असे लिहिले आहे की,
Delhi: Heavy police deployment in Shaheen Bagh as a precautionary measure, even after Hindu Sena yesterday called off protest site clearance call pic.twitter.com/5LVwLcaaoO
— ANI (@ANI) March 1, 2020
‘आपणा सर्वांना सूचित केलं जात आहे की, येथे कलम 144 सीआरपीसी लागू आहे. म्हणून, आपणा सर्वांना विनंती आहे की या भागात कोणत्याही प्रकारे एकत्रित होण्यास किंवा आंदोलन करण्यास परवानगी नाही. याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.’