ख्राइस्टचर्च : हॅग्ले ओव्हलवर सुरू झालेल्या न्यूझीलंडविरूध्दच्या दुस-या कसोटीच्या पहिल्या डावात भारताला २४२ धावांपर्यत मजल मारता आली. त्यानंतर, पहिल्या डावात न्यूझीलंडला २३५ धावांत बाद केल्यानंतर भारतीय संघाला ७ धावांची नाममात्र आघाडी मिळाली. मात्र दुस-या डावातही भारतीय फलंदाजांची हाराकिरी कायम राहिली.
Shami picks up the final wicket of Kyle Jamieson and with that he picks up a 4-wkt haul.
That will be Tea on Day 2 and New Zealand are all out for 235, short by 7 runs.
Scorecard – https://t.co/VTLQt4iEFz #NZvIND pic.twitter.com/BTBijfijup
— BCCI (@BCCI) March 1, 2020
दुस-या दिवसअखेर दुस-या डावात भारताची अवस्था ६ बाद ९० अशी झालेली असून सध्या संघाकडे ९७ धावांची आघाडी आहे. दुस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रिषभ पंत १ तर हनुमा विहारी ५ धावांवर खेळत होता.
That's Stumps on Day 2 of the 2nd Test. #TeamIndia end the day at 90 for 6 and lead New Zealand by 97 runs. #NZvIND
Scorecard ➡️ https://t.co/VTLQt4iEFz pic.twitter.com/cEFA3cLKcx
— BCCI (@BCCI) March 1, 2020
कालच्या बिनबाद ६३ वरून पुढे खेळताना न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ वर संपुष्टात आला. दुस-या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या पाच फलंदाजांना टाॅम ब्लंडेल (३०), केन विल्यमसन (०३), राॅस टेलर(१५), टाॅम लाथम (५२) आणि हेनरी निकोल्स (१४) यांना १३३ धावांवर माघारी धाडले होते.
न्यूझीलंडचा निम्मा संघ १३३ धावांवर माघारी परतल्यानंतर भारतीय संघाला सामन्यात मजबूत पकड घेण्याची संधी होती. मात्र, त्यानंतर कॉलीन डी ग्रँडहोम (२६), नील वॅगनर (२१) आणि कायले जेमिसन (४९) यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई करत संघाची धावसंख्या २३५ पर्यंत नेली. भारतीय संघाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ४, जसप्रीत बुमराहने ३, रविंद्र जडेजाने २ आणि उमेश यादवने १ गडी बाद केला.
त्यानंतर दुस-या डावातही भारतीय फलंदाजांची अपयशाची मालिका कायम राहिली. भारताचे ६ फलंदाज अवघ्या ९० धावांवर माघारी परतले आहेत. यामध्ये पृथ्वी शाॅ (१४), मयंक अग्रवाल (३), चेतेश्वर पुजारा (२४), विराट कोहली (१४), अंजिक्य रहाणे (०९) आणि उमेश यादव (०१) यांचा समावेश आहे.
न्यूझीलंडकडून दुस-या डावात ट्रेट बोल्टने ३ तर टिम साउदी, काॅलिन डी ग्रैंडहोम आणि नील वॅगनर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. आता तिस-या दिवशी हनुमा विहारी, रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा हे भारतीय फलंदाज न्यूझीलंडचा गोलंदाजांचा कसा सामना करतात आणि ९७ धावांच्या आघाडीत आणखी किती धावांची भर टाकतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.