दोन मिनिटांमध्ये डझनभराहून अधिक विषय मंजूर ः सभाशास्त्राचेही धिंडवडे
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वासाधारण सभेमध्ये बोलू दिले जात नाही. नेहमीच बोलण्यापासून डावलले जाते असा आरोप करत शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे यांनी सर्वसाधारण सभेमध्ये ग्लास फोडला. महापौर बोलू देत नाही यावर आक्षेप घेत राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला.
या गोंधळामध्येच महापौरांनी उपसूचना न वाचता अवघ्या दोन मिनिटांमध्ये तब्बल डझनभराहून अधिक विषय मंजूर केले. करवाढीच्या विषयावरून लक्ष हटविण्यासाठी शिवसेनेच्या गटनेत्यांनी फोडलेल्या ग्लासचे भांडवल करत भाजपाच्या नगरसेविकांनी आंदोलन केले. महापौर असुरक्षित असून शिवसेनेच्या गटनेत्यांनी त्यांना ग्लास फेकून मारल्याचा आरोप भाजपने केला.
तर शहरावर लादलेली करवाढ लपविण्यासाठी भाजपची ही स्टंटबाजी असल्याचा आरोपशिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे यांनी केला आहे. एकुणच आजची महासभा वादळी ठरली.