पेठ: आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठारावरील पेठ येथे एका विहिरी मध्ये आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेठ येथील पोलीस पाटील सविता माठे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे नाशिक महामार्गावरील पेठ येथील हॉटेल अजिंक्य च्या पश्चिमे दिशेला अडीचशे फुट अंतरावर शाळेपासून जवळ असणाऱ्या विहीर मालक रामजी सदाशिव गुंजाळ यांच्या ओसाड विहिरीमध्ये अज्ञात इसमाचा पाच ते सहा दिवसांपूर्वी मृत्यू होऊन कुजलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ही माहिती मिळताच मंचर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले पोलीस नाईक चंद्रशेखर डुंबरे, बीट जमादार कैलास कड, पोलीस कॉन्स्टेबल रामदास तनपुरे, होमगार्ड यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन अशोक राक्षे,बाळासाहेब गुंजाळ, सोमनाथ गायकवाड ,उमेश काळे, शरद पवार ,स्वामी माठे या ग्रामस्थांच्या साह्याने दोरीची झोळी करून कुजलेला मृतदेह बाहेर काढला आहे.