#TeamIndia : भारताचे कसोटी अजिंक्यपद धोक्यात

वेलिंग्टन : एकदिवसीय सामन्यांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गतवर्षीपासून सुरू केली. त्यात सातत्यपूर्ण कामगिरी करत गुणतालिकेत अव्वलस्थान राखण्यात यशस्वी ठरलेल्या भारतीय संघाचे अजिंक्यपदाचे स्वप्न धोक्यात आले आहे.

अव्वल स्थानी असलेल्या भारतीय संघाला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागल्याने भारताला अव्वल स्थान राखणे कठीण होणार आहे. पहिला कसोटी सामना जिंकून न्यूझीलंडने ६० गुणांची कमाई केली आहे. या विजयासह आता त्यांचे गुणतालिकेत १२० गुण जमा झाले आहेत.

भारतीय संघ गुणतालिकेत ८ पैकी ७ सामने जिंकून ३६० गुणांसह पहिल्या स्थानी आहे. आॅस्ट्रेलियाने १० सामने खेळताना ७ सामने जिंकत २९६ गुण मिळवले आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.