गोंदवले : समाजातील प्रत्येक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला पुरस्काराने सन्मानित करून माण पत्रकार संघाने एक आदर्श परंपरा जपली आहे. ती दखल घेण्यासारखी आहे, असे मत खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.
माण पत्रकार संघाच्यावतीने दहिवडी येथील प्राचार्य शिवाजीराव भोसले सांस्कृतिक सभागृहात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना माण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, आ. जयकुमार गोरे, आयकर उपायुक्त नितीन वाघमोडे, सभापती कविता जगदाळे, उपसभापती तानाजी कट्टे, गट विकास अधिकारी गोरख शेलार, नगरसेवक युवराज सुर्यवंशी, पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप जठार, प्रा. विश्वंभर बाबर, जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण गोरे, मामूशेठ विरकर, संजय भोसले, बाळासाहेब सावंत, अभय
जगताप, प्रवीण काळे, विजयराज पिसे आदी मान्यवर उपस्थित
होते.
यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, “”माणमध्ये अद्ययावत पत्रकार भवन उभारणीसाठी सवोँतोपरी प्रयत्न करु. त्यासाठी पाच लाख रुपयांचा निधी माझ्या खासदार फंडातून उपलब्ध करून देण्यात येईल. पिढ्यानपिढ्या दुष्काळी असलेला तालख्यात संघर्ष करत असलेल्या जनतेचे प्रश्न मांडून तो प्रश्न सुटेपर्यंत पत्रकार पाठपुरावा करतात, हे कौतुकास्पद आहे, असे आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले. बापूसाहेब गुंजवटे यांनी प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमात विठ्ठल काटकर (कुकुडवाड), सचिन मंगरुळे (म्हसवड), आनंद बडवे (शिंगणापूर), लुनेश विरकर (विरकरवाडी) या पक्षकारांसह डॉ. नितीन वाघमोडे (बनगरवाडी), प्रा. बी.के.देवकर (मोही), अँड. भास्करराव गुंडगे (दहिवडी), डॉ. समीर तांबोळी (गोंदवले), प्रगती गायकवाड (पांगरी), अनिल सुभेदार (उकिडे), अशोक माने (म्हसवड), डॉ. संजय काशिद (दहिवडी), डॉ. सौ. भारती पोळ (मार्डी), राजेंद्र जगदाळे (पिंगळी बद्रुक), प्रसाद माने (काळचौंडी), तनिष्का महिला गट (गोंदवले बुद्रुक) आदींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन आकाश पाटील यांनी केले. लालासाहेब दडस यांनी आभार मानले.