रणवीर सिंहच्या सिनेमांची जेवढी चर्चा होत असते, तेवढीच किंवा त्यापेक्षाही अधिक चर्चा त्याच्या अतरंगी कपड्यांची आणि अफलातून भन्नाट फॅशन ट्रेन्डची होत असते. त्याच्या चित्रविचित्र कपड्यांमुळे सोशल मीडियावर त्याला नेहमीच ट्रोल केले जात असते. पण रणवीरने या ट्रोलिंगकडे अगदी दिलखुलासवृत्तीने प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
आताही त्याने अशाच अतरंगी कपड्यांची झलक दाखवली आहे. त्यामुळे त्याला पब्लिकने ट्रोल करायला सुरुवात केली आहे. गोवाहटीमध्ये आयोजित फिल्म फेअर पुरस्कारांच्या समारंभानंतर सगळे कलाकार मुंबईला परतले. विमानतळावरच रणवीरचा हा अतरंगी अवतार दिसून आला. त्याने ऑरेंज रंगाचा, चकचकणारा लांबलचक कोट आणि त्याच रंगाची पॅन्ट घातली होती.
त्या कपड्यांवर अगदीच न शोभणारी हॅटही त्याने घातली होती. या कपड्यात तो अगदी विदुषक दिसत होता. त्याचा हा लुक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर त्याला पुन्हा ट्रोल करायला सुरुवात झाली. एखाद्या गिफ्टचे पॅकिंग असावे, त्याप्रमाणे हे कपडे वाटत असल्याचे नेटिझन्सनी म्हटले आहे. काही जणांनी रणवीरला “इंडियन लेडी गागा’ म्हणूनही संबोधले आहे. असे अतरंगी कपडे घालायला पण एक आत्मविश्वास लागतो. त्याबद्दल काहींनी रणवीरचे कौतुकही केले आहे.