पिंपरी – तरुणीच्या अंगावर ऍसिड टाकून तिला मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी (दि. 4) पहाटे एकच्या सुमारास मोरया पार्क व सुवर्ण पार्क पिंपळे गुरव येथे घडला.
याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने मंगळवारी (दि. 4) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर सतीश दीक्षित (वय 28, रा. पिंपळे गुरव) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा फिर्यादी तरुणीचा वारंवार पाठलाग करत होता. तसेच तिला शिवीगाळ करून मारहाण केली.
आरोपीने फिर्यादी तरुणीकडे केलेली शारीरिक सुखाची मागणी तिने धुडकावल्याने त्याने गैरवर्तन केले. मंगळवारी पहाटे एकच्या सुमारास सागर पीडित तरुणीच्या घराजवळ गेला. त्याने तरुणीच्या गाड्यांची तोडफोड केली. तरुणीच्या आईवडिलांना शिवीगाळ केली. धमकी देत तरुणीच्या अंगावर ऍसिड टाकण्याचीही धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.