जामखेड : रस्त्यावरील खड्डे चुकवत असताना दोन मोटरसायकलची धडक होऊन एक जण जखमी झाला. हि घटना जामखेड पासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या आरणगाव रोडवर घडली. प्रभू दौलत ढेंबरे(३३) महोजवाडी तालुका, जिल्हा. बीड असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
प्रभू दौलत ढेंबरे हे आपल्या एम एच २३ ए.क्यू ८६४६ दुचाकीने भुईंज कारखान्याला चालले होते. त्यावेळी हा अपघात झाला. घटनेची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. जखमींना जामखेड येथिल दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना संजय कोठारी म्हणाले की, रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे सतत अपघात घडतात. या अगोदर बऱ्याच वेळी संबंधित विभागाला कळवून देखील त्यांनी काहीच दाखल घेतली नाही. रस्त्याची तात्काळ दुरुस्थी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.