“कोरोना’मुळे चीनी शेअर बाजार कोसळला

तब्बल 32 लाख कोटी गमावले

बीजिंग : “कोरोना’ विषाणू उद्रेकाचा फटका चीनच्या अर्थव्यवस्थेलाही बसणार हे हळूहळू स्पष्ट होत आहे. सोमवारी चीनमधील शेअरबाजाराने गेल्या 13 वर्षांमधील नीचांकी पातळी गाठली. विदेशी गुंतवणूकदारांनी मोठया प्रमाणावर समभागांची विक्री केल्याने निर्देशी सूचकांकाची 7.7 टक्के घसरण एका दिवसात झाली.

कोरोनाचे संकट लवकर दूर झाले नाही, तर येत्या तीन महिन्यात चीनी शेअरबाजारांचे अडीच लाख कोटी रूपयांचे नुकसान होऊ शकते. यामुळे गुंतवणूकदारांना 32 लाख कोटी रुपयांचा मार बसला आहे. शेअरबाजाराप्रमाणेच चीनचे चलन असणारा युवानही मोठया प्रमाणात घसरला आहे.

सोमवारी एका दिवसात चीनच्या चलनाची किंमत अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत 1.5 टक्‍क्‍यांनी कमी झाली. चीनने आपल्या केंद्रीय बॅंकेतून शेअरबाजारात पैसा ओतून तो सावरण्याचा प्रयत्न केला. तसेच रूपयालाही बळकटी देण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्याचा उपयोग न होता, घसरण सुरूच राहिली.

शेअरबाजाराच्या घसरणीने ज्या कंपन्यांना फटका बसला आहे, त्यांना यावर्षी कर्जांवरील व्याजदरात काही प्रमाणात सूट देण्याची घोषणा चीनने केली. असेच आर्थिक साहाय्य कोरोना पिडीत लोकांनाही दिले जाणार आहे. चीनच्या केंद्रीय बॅंकेने त्यादृष्टीने आपत्कालीन योजना सज्ज केली आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.