नवी दिल्ली : देशविरोधी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या जेएनयू विद्यार्थी शर्जील इमाम याला पाच दिवसांची पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा निर्णय दिल्लीतील साकेत न्यायालयाने दिला असून क्राइम ब्रान्चला शर्जीलची कस्टडी मिळाली आहे.
शर्जीलला मंगळवारी जहानाबाद येथून अटक करण्यात आली होती. शर्जीलने दावा केला होता की तो शरण आला होता. मात्र, पोलिसांना हा दावा फेटाळला होता. दिल्ली पोलिसांना मंगळवारी त्याची ट्रान्झिट रिमांड मिळाली होती.
आधी अशी चर्चा होती की शर्जीलला पतियाळा हाऊस कोर्टात न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात येणार आहे.
त्यामुळे तेथे वातावरण तणावग्रस्त बनले होते. या दरम्यानच काही वकिलांनी शर्जील याच्याविरोधात घोषणाही दिल्या. त्यांच्या हातात पोस्टरही दिसत होते. त्यावर शर्जीलला ‘देशद्रोही’ असं संबोधण्यात आलं होतं. वकिलांनी त्याला फाशी देण्याचीही मागणी केली. कोर्टाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.